Sunday, May 19, 2024

नगरमध्ये राजकारण… कळमकर यांच्या पुढाकाराने भाजप पदाधिकारी समर्थकांसह शरद पवार गटात दाखल…

भाजपाचे रोहन शेलार समर्थकांसह राष्ट्रवादीत

खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रवेश

अभिषेक कळमकर यांच्या शिष्टाईला यश

नगर : प्रतिनिधी

भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी उपशहर जिल्हाध्यक्ष, विधानसभा सुपर वॉरिअर, शक्ती केंद्र प्रमुख तथा संघर्ष युवा मंचचे अध्यक्ष रोहन शेलार यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात समर्थकांसह प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खा. डॉ. अमोल कोल्हे, मा. मंत्री बाळासाहेब थोरात तसेच उमेदवार नीलेश लंके यांनी शेलार व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले.
नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शेलार व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
प्रवेशाप्रसंगी जुबेर उर्फ बाबू कुरेशी, अजय पाटोळे, सुधाकर साळवे, विकी पवार, संदीप गायकवाड, अफजल कुरेशी, आकाश कोरे, हरीश पडांगळे, वाजिद शेख, कल्याण कुरेशी, शाहेबान बागवान, रिजवान शेख, इमरान कुरेशी, बंटी शिंदे, साहिल कुरेशी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याबरोबरच पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी परीश्रम घेण्याचा निर्धार रोहन शेलार व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. नगर शहरामध्ये नीलेश लंके यांना मोठा जनाधार असून सर्वसामान्य जनतेच्या गळयामधील ते ताईत बनले आहेत. कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन लंके यांनी हजारो रूग्णांची सेवा केली. स्वतःचा मतदारसंघ नव्हे तर जो रूग्ण येईल त्यास मदत करण्याची त्यांनी घेतलेली भूमिका त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखीत करते. त्यामुळेच लोकसभा निवडणूकीत त्यांचा मोठया मताधिक्क्याने विजय होईल असा विश्‍वास शेलार यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles