Friday, May 17, 2024

वाढता दहशतवाद रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, सौरभ खेडेकर

नगर (दि.1 मे 2024) ः समाजिक भान भेवून समाजहितासाठी संभाजी ब्रिगेड यांनी नैतीन जबाबादारी समजून समाजाचा गाडा हाकला, काम उभ केले आता येणर्‍या निवडणुकीमध्ये एक राष्ट्र, एक हित समजून राष्ट्राच्या हितासाठी मान, पान बाजुला ठेवून एक स्वतंत्र लढा आपल्याला लढायचा असून वाढता दहशतवाद रोखायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणण्या शिवाय पर्याय नाही. जिल्हयात महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याची गरज असून त्यासाठी एकदिलाने कामाने लागा असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले. दरम्यान विदर्भाच्या शैलीमध्ये कराळे मास्तर यांनी मोदींवर सडकुन टीका करत वाभाडे काढले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगर येथे माऊली सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ही जिजाऊ वंदनेने करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेद्र फाळके, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर, संदिप कडलग, कराळे मास्तर, संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, उत्तरेचे शिवाजी पवार, आपचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ आघाव, निलेश मालपाणी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेडेकर म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये बसलेले अनेक खोटे नाटे आश्वासने देवून खोटे आकडे लोकांच्या समोर मांडत आहे. एकीकडे विकास केला म्हणून दाखवायचा आणि दुसरीकडे देश हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. आज आपल्या देशावर 205 लाख कोटी रुपयांचे  कर्ज आहे. पदावर बसलेला माणूस याबद्दल काहीच सांगत नाही, त्यामुळे आता आपल्याला आकाशवाणी करण्याची गरज असून तळागाळातील माणसाला यांचा खरा चेहरा दाखवून द्यायचा असून आपल्याला ताकदीने समाजामध्ये हे मांडायचे आहे असे ते म्हणाले.

आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मोठा फौजफाटा त्याचा तयार झाला आहे. त्यातुनच मुलाना नैराश्य आले आहे. नोकर्‍या नाहीत म्हणून लग्न होत नाही. त्यामुळे व्यसनाधीनता वाढत चालली आहे. देशामध्ये ही भयान परस्थिती आता निर्माण झाली. आगामी काळात लुटालुट, दंगे असे प्रकार वाढत जाणार आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर आपल्याला म्हणजेच संभाजी ब्रिगेडला नैतीक जबाबदारी म्हणून समाजासाठी जे काही आपण करत आलेलो आहोत. ते कार्य आपल्याला पुढे घेवून जायचे असेही ते म्हणाले. आज कुठेही मोबाईल, टीव्ही, पेपर पाहिला तरी या सत्ताधार्‍यांचा फोटो दिसतो व खोटे आकडे हे सांगितले जातात. त्यामुळे आपल्याला हे हाणून पाडायचे आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकोप्याने येवून कामाला लागा असे खेडेकर म्हणाले.

कराळे मास्तर यावेळी बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी कितीही चांगलं संविधान लिहिलं तर संविधानानुसार वागणारे लोक जर या देशात नसतील तर असे दाढीवाले (मोदी) बदमाश असतील तर या देशाचा सत्यानाश होईल. याच काय कोणत्याही देशाची घटना जर टिकवायची असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हंटले की, लोकशाही ही तेंव्हाच जिवंत राहू शकते जेंव्हा सत्तेत असणारी लोकं विरोधी पक्षाच्या मताचा आदर करतील, मात्र हा चोट्टा आदर करायला तयार नाही. हे स्वतःच्या भाषणात म्हणतात की, मै फकीत हूँ झोला लेक चल पडूंगा, तो आपल्यालाही भिकारी बनवणार हेपक्क ध्यानात घ्या. तुम्हाला अहमदनगर लोकसभेसाठी निलेश लंकेच्या स्वरूपात एक चांगला उमेदवार  मिळाला आहे. त्यांनी कोरोना काळात केलेले काम सर्वांना हे सर्वांना प्रेरणा देणार आहे असे ते म्हणाले.

शिवसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की, संभाजी ब्रिगेडचे कार्य व शिवसेनेच कार्य हे जवळपास सारखे आहे. आज आम्ही खर्‍या आर्थाने एकत्र आलो. आपल्याला आता मित्र मिळाला आणि तो ही तोडीचा, ज्याच्या बरोबर आम्ही पंचविस वर्ष काम केले भाजपा आमच्या जिवावर मोठी झाली. मात्र, त्यांनी आता विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना आता त्यांची दाखवून देण्याशिवय पर्याय नाही असे दळवी म्हणाले,

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले आज आपण खेडेकरांना जी पगडी घातली ती ज्योतीबा फुले यांची ती पगडी त्यांचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवायचा आज बापाला बाप म्हणायचे नाही अशा पध्दतीचे राजकारण आपण येवून पाहतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचा रोष आहे असे सांगून शरद पवार यांनी जो विचार दिला तो विचार आम्ही आता सर्वांपर्यंत पोहचवत आहोत. नगरची निवडणुक ही धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे. हे जनतेने आता हातात घेतली आहे असे ते म्हणाले,

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले की, लोकशाही वाचवायची आहे. सामान्य जनतेला सुखाचे दिवस दाखवायचे आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, कामगार यांच्या अडी अडचणी, समस्या सोडवणे यासाठी संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीचे नगर लोकसभेेचे उमेदवार निलेश लंके व शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रमाणिकपणे काम करावे, या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश सचिव डॉ.संदिप कडलग, संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, शिवसेना नेते अशोकराव गायकवाड, इंजि.शाम जरे, निलेश बोरुडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होतेे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद जोशी, निलेश बोरुडे, डॉ राहुल देशमुख, अचुत गाडे, बंटीभाऊ भिंगारदिवे, सुदामराव कोरडे, सचिन काकडे, दत्ता भोसले, राजेंद्र काटकर, लक्ष्मण गायके, अवि मेढे, अवि ठांणगे, मच्छिंद्र गुंड आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles