Friday, May 17, 2024

ब्रेकिंग! शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; निष्ठावंत नेता भाजपच्या गळाला

माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी १ मेच्या रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंढरपुरातील निष्ठावंत मोहरा भाजपच्या गळाला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. तेव्हापासून अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अखेर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रात्री पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये त्यांनी माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहिर केला आहे. अभिजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles