Friday, May 17, 2024

अजितदादांनी आईची योग्यता काढताच रोहित पवार भडकले… दिलं सणसणीत उत्तर…

कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या देखील सुळे यांच्या बाजुने प्रचार करत आहेत. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी बारामतीमध्ये धनशक्तीचा वापर होणार असल्याचे म्हटलं होतं.बुधवारी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रमासाठी पालकमंत्री अजित पवार आले होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यावेळी सुनंदा पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत अजितदादांना विचारले असता. मी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही.आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याला मी उत्तर देईल, असे भाष्य केले होते. अजित पवारांनी आपली आई बद्दल केलेल्या वक्तव्याचा आमदार रोहित पवारांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. एक्सवर ट्विट करत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आम्ही आजपर्यंत तुमचा प्रचार केला तेव्हा आम्ही योग्यतेचे होतो, आता योग्यतेचे वाटत नाही, असा हल्लाबोल रोहित पवारांनी अजितदादांवर केला आहे. शिवाय बाकी सगळे विरोधात असलेले नेते आता तुमच्या योग्यतेचे आहेत, असा टोला देखील रोहित पवार यांनी त्यांना लगावला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles