Sunday, May 19, 2024

शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान…जाणून घ्या कारण

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शरद पवार यंदा मुंबईऐवजी बारामतीच्या माळेगावमधून मतदान करणार आहेत. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये बदलून घेतले होते, मात्र यंदा निवडणूक अटीतटीची असल्याने ते पुन्हा बारामतीमध्ये मतदान करणार आहेत. तसेच आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत.

१९६७ पासून पवार हे बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. २०१४ पर्यंत ते पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करायचे. मात्र, पक्षात पडलेल्या फूटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ते मतदान करणार आहेत. मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंदबागेतच थांबणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles