Friday, May 3, 2024

अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण यांचे निधन

शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण अभ्यासू व्यक्तिमत्व होते – आमदार कानडे
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी,शिक्षक बँकेचे माजी संचालक रमजान पठाण एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्याचे तंत्र त्यांना अवगत होते.संच मान्यतेमध्ये त्यांचा हातखंडा होता. सीओपासून शिपायापर्यंत सर्व त्यांचे मित्र होते त्यांनी आपल्या स्वभावाने फक्त मित्र जोडले. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एकत्र काम केले.त्यांच्या अचानक जाण्यामुळे शिक्षण विभागामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहू कानडे यांनी केले.
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रशासन अधिकारी रमजान पठाण यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री आठ वाजता दुःखद निधन झाले.ते 55 वर्षाचे होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी तसेच श्रीरामपूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
त्यांचे मागे बंधू शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण,
रज्जाक पठाण,पत्नी दोन मुले सुना असा परिवार आहे.
मिल्लत नगर मधील गार्डन रेसिडेन्सी मधील त्यांच्या निवासस्थानापासून अंतयात्रा रविवारी सकाळी दहा वाजता कब्रस्तान कडे रवाना झाली.अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी पार पडला.
कब्रस्ताना झालेल्या श्रद्धांजली सभेत आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,
पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे,शिक्षक नेते बापूसाहेब तांबे,संजय शेळके,शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे, नगरसेवक अंजुमभाई शेख,रवींद्र गुलाटी, शिक्षक बँकेचे माजी संचालक नानासाहेब बडाख,मार्केट कमिटीचे संचालक दशरथ पिसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी,शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे,शिक्षक नेते विजय काटकर, पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे,शिक्षण मंडळाचे माजी प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे,लिपिक किशोर त्रिभुवन यांचे सह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पठाण यांच्या अचानक निधनाने महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे नेते कार्यकर्ते व शिक्षकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.अंतयात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles