Monday, April 29, 2024

बाळासाहेब थाेरात म्हणाले…..सांगली लाेकसभा मतदारसंघ आमचाच पण…

सांगली लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काॅंग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने मतदारसंघातील काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची माेठ्या प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीतून विशाल पाटील यांच्या समर्थकांनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरावा असा आग्रह धरु लागले आहेत पाटील पुढं बाेलताना म्हणाले यंदाची 14 वी लोकसभा निवडणूक आहे. आमच्या ग्रामदेवताचं दर्शन घेऊन आमची परंपरा आहे तसे आम्ही अर्ज भरला आहे. थाेड्याच वेळात कलेक्टर ऑफिसच्या दिशेने आम्ही निघणार आहाेत.

विशाल पाटील यांच्याकडे अजूनही एबी फॉर्म काँग्रेसचा नाही. काँग्रेसच्या सेंट्रल कमिटी मध्ये विशाल पाटील यांचे नाव होतं. सांगली नैसर्गिक आमची जागा होती. आमचा परंपरागत उमेदवार आहे. ती जागा आम्हांला मिळावी अशी अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्याची भावना साहजिक आहे. पण जेव्हा आघाडीत आपण पुढे जात असतो. त्याचे काही फायदे तोटे तोटेही स्वीकाराचे असतात असे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अजूनही विशाल पाटील यांच्याशी बोलून, स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीच पाऊल उचलले जाणार नाही याची काळजी घेत असल्याचे थाेरात यांनी नमूद केले.
https://twitter.com/patilvishalvp/status/1780081015861735684/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1780081015861735684%7Ctwgr%5E0e5a423e12e52d511b6c745187b6dfc2816c49fb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Flok-sabha-election%2Fcongress-leader-vishal-patil-to-fill-form-for-sangli-constituency-sml80

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles