Tuesday, March 18, 2025

तर तुमच्या दहा पिढ्यांना गुलाल लागणार नाही….जरांगे पाटील यांचा मोठा इशारा

बीडमधील आष्टी जवळील अंबोरा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यांना हात घातला. मराठा ताकतीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की चांगल्या चांगल्याने गुडघे टेकावे लागत आहे.मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टक्क्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि.दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे, असे ते म्हणाले. भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता, आमच्या माय लेकीचे डोके फोडले.मोदी सध्या गोधड्या घेवून मुक्कामी आहेत. मी कोणालाही निवडून द्या म्हटलो नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर तोंडसूख घेतले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसह देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी भाषणातून लक्ष केले. कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील यांना तेरे नाम, खेकड्याची ओलाद असे ते म्हणाले. मी कधी नादी लागलो रे तुझ्या अशी टीका त्यांनी केली. फडणवीस साहेब तेरे नाम ला समजून सांगा. जामनेरच्या पंधरा रुपयाचा पट्टा घालणाऱ्या लां मी नीट केले आहे, असा टोला त्यांनी हाणला. या सभेत जरांगेंच्या एका विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरवली. या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles