अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
Breaking…डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेपेची शिक्षा
- Advertisement -