Monday, May 20, 2024

ब्रायन लारा म्हणतो, ‘हा’ भारतीय खेळाडू मोडेल ४०० धावांचा विक्रम

भारतीय संघातील स्फोटक सलमीवीर शुभमन गिल हा कसोटीमधील एका डावामध्ये नाबाद 400 धावांपेक्षा अधिक धावा करु शकतो असं माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने म्हटलं आहे. कसोटीमध्ये 400 धावांपर्यंत पोहोचणारा ब्रायन लारा हा जगातील पहिला आणि आजच्या तारखेपर्यंत एकमेव क्रिकेटपटू आहे. लाराने 2004 साली इंग्लंडमधील कसोटीमध्ये एकाच डावात नाबाद 400 धावा केलेल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात एकाच खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही लाराच्या नावावरच आहे. लाराने 1994 साली कंट्री चॅम्पियन सामन्यामध्ये नाबाद 501 धावांची खेळी केली होती.

लाराने ‘आनंदबाझार पत्रिका’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे , सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये शुभमन गिल हा सर्वात टॅलेंटेड क्रिकेटपटू असल्याचं लाराने म्हटलं आहे. “सध्याच्या पिढीमध्ये शुभमन गिल हा सर्वोत्तम फलंदाज आहे. पुढील काही वर्षांमध्ये तो क्रिकेट विश्वावर राज्य करेल. मला वाटतं की तो अनेक मोठे विक्रम मोडीत काढेल,” असं लाराने म्हटलं आहे. “माझे दोन्ही विक्रम (कसोटीत 400 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 501 धावांचा विक्रम) शुभमन मोडेल,” असं लाराने म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles