Video:गौतमी पाटील उतरली क्रिकेटच्या मैदानात ,क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये भन्नाट नृत्य

0
15

आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. नेहमी वाढदिवस, रिसेप्शन पार्ट्या अन् उत्सवांमध्ये थिरकणारी गौतमी पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यांच आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटीलने व्यासपीठावर नृत्य केलं,यावेळी खेळाडूंसह प्रेक्षकांचा हि गौतमी पाटील च्या नृत्यांला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.