Monday, May 20, 2024

Video: गौतमी पाटीलचं खरं नाव आणि आडनाव काय आहे? स्वतःचं केला खुलासा…

सबसे कातील, गौतमी पाटील अशा घोषणांनी प्रसिद्ध असणाऱ्या गौतमीने अलीकडेच एका कार्यक्रमात चाहतीशी गप्पा मारताना आपलं नाव वेगळंच सांगितलं आहे. जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकमात गौतमी हिला देखील बोलावण्यात आलं होतं. तेव्हा गौतमी हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली. गौतमीने या चिमुकल्या चाहतीला तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने नाव वैष्णवी आहे असं सांगितलं. यावर गौतमी म्हणाली, ‘माझं देखील जन्मनाव वैष्णवी असं आहे…’. हा खुलासा गौतमीने गप्पांच्या वेळी केला आहे त्याचा काही पुरावा दाखवलेला नाही पण आता या वैष्णवी नावावरून गौतमी पुन्हा चर्चेत आली असं म्हणायला हरकत नाही.
गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. गौतमी हिने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देखील तिला देण्यात आला होता. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटीव नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता. यावर गौतमीच्या वडिलांनी सुद्धा त्यावेळी गौतमी ही पाटीलच आहे आणि पाटीलच नाव लावणार अशी भूमिका मांडली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles