Sunday, May 19, 2024

मोठी बातमी! पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान पार पडणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.

राज्यात चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. १० जून रोजी मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. राज्यात चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे.

१० जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १३ जून रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची (माहिती मिळत आहे. १८ जूनअगोदर मतदानाची संपूर्ण प्रकिया पार पडणार आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडाल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक पार पडणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles