Friday, May 3, 2024

प्रेम विवाह करणाऱ्या तरूणीला लग्नमंडपातून फरफटत ओढून नेलं…धक्कादायक व्हिडिओ

अनेकदा प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या कुटुंबियांची लग्नमंडपात एन्ट्री होते अन् मोठा गोंधळ उडतो. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणीला चक्क कुटुंबियांनी लग्नमंडपातून फरफटत नेलंय. प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियामधील घडलाय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, साधारण चार-पाच तरुण लग्नाच्या मंडपातून नवरीला त्यांच्यासोबत जबरदस्तीने घेचून घेऊन जात आहेत. या घटनेप्रकरणी नवदेवाच्या कुटुंबीयांनी त्या तरुणांविरुद्ध अपहरणाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. https://x.com/umasudhir/status/1782341871869759645

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles