Saturday, May 4, 2024

बारामतीत प्रचार शिगेला, पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा, सरकारचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

कार्यकर्ते तसेच मतदारांच्या भेटीगाठी वाढल्याने पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles