Wednesday, April 17, 2024

Video : भारताचा युवा खेळाडू चमकला; एकाच षटकात लगावले ६ षटकार

इंडियन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अंडर-२३ कर्नल सीके कर्नल नायडू ट्रॉफी सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये आंध्र प्रदेशचा एक फलंदाज वामशी कृष्णाने धुव्वादार फलंदाजी केली आहे. वामशी कृष्णाच्या फलंदाजीमुळे सर्वच चकीत झाले आहेत. २२ वर्षीय खेळाडूने कसोटी सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये टी-२० क्रिकेट फॉरमॅटसारखी तुफानी फलंदाजी केली आहे. त्याच्या दमदार फलंदाजीचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
अंडर-२३ कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेश आणि रेल्वेदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशचा सलामीवीर वामशी कृष्णाने रेल्वेच्या स्पिनर दमनदीप सिंहने एकाच षटकात ६ षटकार लगावले आहे. वामशीने ६४ चेंडूत ११० धावांची शतकी खेळी खेळली आहे. आंध्र प्रदेशच्या टीमने पहिल्या डावात ३७८ धावांची धावसंख्या उभारली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles