Tuesday, May 21, 2024

कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार अचानक काढला… नवीन प्रभारी नियुक्त

कर्जत : कर्जतच्या प्रभारी गटविकास अधिकारी राणी फराटे यांचा पदभार अकस्मात काढून घेत जामखेड येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना कर्जत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. काल कर्जत पंचायत समितीमध्ये त्यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला आहे. राणी फराटे या श्रीगोंदा येथील गटविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कर्जत येथील श्री. शेंडगे यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर श्रीमती फराटे यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले होते. श्रीमती फराटे यांनी पदभार घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने कामही सुरू केलेल्या असताना अचानक त्यांचाकडील सूत्र काढून घेत जामखेड येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना पदभार देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles