Monday, May 20, 2024

‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील… मराठी चित्रपटाचा टिजर व्हिडिओ रिलीज…

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता “संघर्षयोद्धा”- मनोज जरांगे पाटील या मराठी सिनेमातून मांडली जाणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार टीजर रिलीज करण्यात आला असून, 26एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत , शिवाजी दोलताडे यानी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे , डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा केली आहे.

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles