आता पुण्याला नादवणार आपली फुला…प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’चा दमदार ट्रेलर Video

0
73

‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादवणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात ‘फुलवंती’ सिनेमाचा टीझर काही दिवसांआधी रिलीज झाला. या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून प्रेक्षकांची नजर हटत नाही. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.