Saturday, May 18, 2024

शरद पवारांची ‘ती’ लकब या कारणांमुळे…राज ठाकरेंचे मार्मिक विश्लेषण…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘बोल भिडू’ या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांना सध्याच्या राजकारण्यांच्या भाषणांच्या पद्धतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज यांनी शरद पवार यांच्या एका लकबीचा उल्लेख केला.

शरद पवार यांना तुम्ही मुलाखत देताना पाहिलं तर ते खुर्चीवर बसले असतात तेव्हा सतत खुर्चीच्या दोन्ही बाजूंवर हात आपटत असतात. कारण सभागृहात खासदार किंवा आमदार टाळ्या वाजवत नाहीत, तर बाकडे वाजवतात. शरद पवार यांनी इतकी वर्षे राजकारणात काढल्यानंतर बाक वाजवण्याची सवय त्यांच्या अंगात इतकी मुरली आहे की, सहज मुलाखतीमध्ये बोलतानाही ते खुर्चीच्या दोन्ही बाजूंना हात आपटत असतात, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles