नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला आहे. महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. महायुतीकडून यासंदर्भात परिपत्रक काढत हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहे.
नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटला, हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा
- Advertisement -