Monday, May 20, 2024

नगर – सोलापूर महामार्गावर कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक एकाचा जागीच मृत्यू

नगर – सोलापूर महामार्गावर दरेवाडी जवळ तुक्कड ओढ्याच्या पुढे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरु असताना ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओहरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या मारुती स्विफ्ट कार ला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २६) रात्री १० च्या सुमारास घडली.

प्रमोद विष्णु कवळे (वय ३५, रा. नागलवाडी, ता. कर्जत) असे मयताचे नाव आहे. मयत कवळे हे आपल्या मारुती स्विफ्ट कार ने मंगळवारी (दि. २६) नगर मध्ये एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नगर हून पुन्हा ते गावाकडे जात असताना दरेवाडी जवळ तुक्कड ओढ्याच्या पुढे उड्डाणपुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरु होती.

ते जात असताना समोरून नगरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओहरटेक करण्याच्या नादात कारला जोराची धडक दिली. या धडकेत कार चालवत असलेले कवळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या खबरेवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत कवळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, १ मुलगी, असा परिवार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles