Monday, May 20, 2024

पंतप्रधान मोदी व शरद पवार यांच्यात ‘गुफ्तगु’…नवी दिल्लीत झालेल्या भेटीची जोरदार चर्चा

pawar meets modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भेट झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही बैठक वन-टू-वन बैठक होती. या बैठकीत इतर कोणतेही नेते उपस्थित नव्हते. दोघांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. कालच राज्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची अलिबाग जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. त्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यातील भेट यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles