Saturday, May 18, 2024

राम नवमीला नगरमध्ये दुर्देवी घटना, 2 सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

संगमनेर – श्रीराम नवमीचा उत्सव साजरा होत असतानाच दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे. रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८) अशी मृत्यू झालेल्या भावंडाची नावे आहे.

अधिक माहिती अशी: दोघे ही भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिक्षण घेत होते. मोठा रितेश हा इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत होता तर लहान प्रणव हा इयत्ता 3 री मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. वडिलांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाल्याने वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे, आई फार कष्टाने शेती करून आपला उदरनिर्वाह करत मुलांचा सांभाळ करत होती.

बुधवार दि. १७ एप्रिल रोजी रामनवमी असल्याने मुलांना शाळेला सुट्टी होती. त्यामुळे, ते दुपारी जेवण करून घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. खेळत- खेळत ते शेततळ्याच्या शेजारी आले. खेळता- खेळता दोघेही शेततळ्यात पडले. शेततळ्यात पाणी मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांना ठाव लागला नाही. दोघांनी आपल्या प्रयत्नांना पूर्णविराम दिला. दरम्यान काही काळानंतर हा प्रकार मळ्यातील लोकांनी पाहिल्यानतंर उघडकीस आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles