Friday, May 17, 2024

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर हार्दिक पंड्याचा उपकर्णधारपद म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी हार्दिक पंड्याला संघात घेणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासह त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत तो अष्टपेलू खेळाडू म्हणून संघात खेळताना दिसेल.

या संघात फलंदाज म्हणून रोहित शर्मासह, विराट कोहली,यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघाची घोषणा होण्यापूर्वी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांत्या नावाची चर्चा होती. अखेर गिलऐवजी यशस्वीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतसह संजू सॅमसनला देखील स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे संजू सॅमसनचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्नं पूर्ण झालं आहे. तर फिनिशर म्हणून शिवम दुबेला या संघात स्थान दिलं गेलं आहे. तर गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles