Wednesday, May 1, 2024

गावोगावी कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात घेतली आघाडी

नगर जिल्हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, आणि धार्मिक स्थळांची परंपरा पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू आशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गावोगावी कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून त्यांनी मतदार संघातील विकासाच्या संकल्पना मांडून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात भव्य किल्ल्यांपासून ते ऐतिहासिक वारसा असलेली तिर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक तालुका एका तिर्थक्षेत्राची ओळख म्हणून नावलौकीक मिळून आहे. जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला असलेल्या संधी विचारात घेवून जिल्ह्याचा पर्यटन विकासाला गती देण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे डाॅ. विखे म्हणाले.

रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. अशी अनेक स्थळे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात. यामुळे पर्यटन विकास झाल्यास त्याच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे प्रामुख्याने पर्यटन विकास हा आपल्या अजेंड्यावरील प्रमुख विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकांचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असून सुजय विखे पाटील हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत. त्याच बरोबर ही देशाचे नेतृत्व ठरविणारी निवडणुक असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या शिवाय पर्याय नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

मागील पाच वर्षात मतदारसंघाच्या विकसासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकास काम मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.युवकांच्या रोजगारा करीता श्रीगोंदा वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहती करता देण्याचा निर्णय झाल्याने मोठे उद्योग मतदार संघात येण्यास तयार झाले असल्याचे खा.विखे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles