Saturday, May 18, 2024

शिर्डीत महाविकास आघाडीला मोठा धक्का! उत्कर्षा रुपवते वंचितकडून लढणार?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांचा काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोला येथे प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत १७ एप्रिल रेजी रात्री हा पक्ष प्रवेश पार पडला.

महाविकास आघाडीत शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी रूपवते आग्रही होत्या. मात्र, शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिल्याने रूपवते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. उत्कर्षा रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. रूपवते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्याचं मानल जातं.

काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची उमेदवारी नाकारली जात असल्याने निराशेची भावना त्यांच्या मनामधून होती. अखेर उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता उत्कर्षा रूपवते वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचं चित्र आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles