हा व्हिडीओ shankar_a_gulvi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बॅट्समननं मोठा फटका मारला. पण प्रतिस्पर्धी खेळाडूनं चांगली फिल्डिंग करून बॉल अडवला आणि लगेचच विकेटकिपरकडे थ्रो केला. पण या दरम्यान २ धावा काढण्याची संधी होती. पण नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन मात्र २ धावा काढण्यास तयारच नव्हता. पहिली धाव काढून तो जागेवरच थांबला. तर दुसरीकडे बॅटसमननं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. परिणामी एकाच ठिकाणी २ फलंदाज उभे होते. परिणामी प्रसिस्पर्धी संघाला रनआऊट करण्याची नामी संधी मिळाली. पण बॅट्समन हुशार निघाला. स्वत:ची विकेट वाचवण्यासाठी त्यानं साथीदाराला ख्रिजच्या बाहेर ढकलून दिलं आणि त्याला आऊट केलं. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.
- Advertisement -