Saturday, May 18, 2024

….अखेर निंबळक येथील “त्या” रस्त्याचे काम सुरू

….अखेर निंबळक येथील “त्या” रस्त्याचे काम सुरू
सरपंच सौ.प्रियंका लामखडे यांच्या प्रयत्नाला यश
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक परिसरातील हॉटेल सावली ते निंबळक बायपास रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हॉटेल सावली ते निंबळक बायपास रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे नेहमीच लहान-मोठे अपघात घडत होते. सदर रस्ता पूर्ण करण्याबाबत निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी आक्रमकता दाखवत सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला होता. संबंधित ठेकेदारास वारंवार काम दुरुस्त करण्याबाबत सरपंच लामखडे यांनी मागणी केली होती.
सदर रस्त्याच्या दुरुस्तीविषयी आमदार निलेश लंके यांनीही याबाबत सूचना केल्या होत्या. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत शिंदे, बाबासाहेब पगारे, किरण गायकवाड, घनश्याम म्हस्के, भाऊसाहेब शिंदे, गंगेश रोकडे, सोमनाथ खांदवे यांचेही सहकार्य लाभले. सदर रस्त्याचे काम सुरू झाल्याने निंबळक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असुन सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले आहे.

हॉटेल सावली ते निंबळक बायपास रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. नागरिकांचे अतोनात हाल होत होते. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदाराशी वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले आहे. संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने निंबळक ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता दुरुस्तीचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे.
…..सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच निंबळक)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles