Thursday, May 16, 2024

‘ईडी’ने जि.प.सदस्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, मनसेची मागणी

‘ईडी’ने जि.प.सदस्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, मनसेची मागणी
बीड : मागच्या काही दिवसांपासून ईडी ज्या प्रकारे कारवाई करते आहे त्याची राज्यभर चर्चा आहे. ईडीची कारवाई जरी मोठ्या शहरापुरती मर्यादित असली तरी त्याची चर्चा आणि परिणाम आता छोट्या गावांमध्ये पाहायला मिळत आहेत. बीडच्या नांदूरघाट परिसरामध्ये स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी ही थेट ईडीने करावी, असे बॅनर्स मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी लावले आहेत.
नांदुरघाटमधील विकास काम करताना कोट्यावधी रुपयांची अनियमितता झाल्याची तक्रार यापूर्वीच सुमंत धस यांनी केजच्या तहसिलदाराकडे केली होती. याच मागणीसाठी सुमंत धस यांनी काही दिवसांपूर्वी नांदुरघाटमध्ये उपोषण केले होते.

या उपोषणा वेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले कुठे मात्र त्याचा पुढे काहीच उपयोग झाला नाही असं सुमंत धस यांचे मत आहे. म्हणूनच सुमंत धस यांनी आता या कामांची चौकशी ईडीने करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles