Saturday, May 18, 2024

कर्तव्यावर असताना गणवेश बंधनकारक अन्यथा कारवाई, पोलिस अधीक्षकांचे आदेश जारी

नगरचे पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलिसांनी गणवेश वापरण्याबाबत काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, या प्रकारचे आदेश बजावले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसह विविध शाखांच्या प्रभारी अधिकार्‍यांना हे आदेश बजावण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, यासाठी संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सूचित करण्यात आले आहे. गोपनीय शाखा वगळता सर्वांनी गणवेश घातलाच पाहिजे, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये पोलीस विभागांमध्ये कार्यरत असलेले अनेक पोलीस अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना गणवेशामध्ये नसतात. खासगी गणवेश परिधान करून ते नोकरी करत असतात. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी आहे की नाही याची माहिती लोकांना कळत नाही. अनेक ठिकाणी पोलीस असल्याचे सांगून वेगळ्याप्रकारे फसवणूक केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस विभागाने याबाबत विशेष दखल घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles