Thursday, May 9, 2024

केडगाव शिवसैनिक हत्याकांड… मुंबईत उपोषण करणार्या कुटुंबियांची उपसभापती निलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव हत्याकांड
यासंदर्भात उपोषणास बसलेले पीडित कुटुंबीयांनी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानंतर उपोषण घेतले मागे…
मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातील महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगाव परिसरात घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे.
यात विशेष सरकारी वकील म्हणून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि सीआयडीच्या वतीने अँड. अजय मिसर यांच्या नियुक्तीची मागणी झाली होती. सध्या सीआयडीकडून तपास सुरू असताना यात पूर्वीच्या तपास अधिकाऱ्यांनी काही चुकीचे शपथपत्र देण्यात आले असल्याचे कोतकर आणि ठुबे कुटुंबायांचे म्हणणे असून यासंदर्भात त्यांनी उपोषण केले होते.याची माहीती मिळताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अप्पर मुख्य सचिव गृह विभाग यांची बैठक बोलावली. यात तात्काळ अँड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी सीआयडी अधीक्षक श्रीकांत धावरे आणि तपास अधिकारी नारायण सस्ते यांना पुढील तपासबाबत योग्य काळजी घेण्याची सुचना केली.यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतलेल्या पुढाकार आणि दिलेल्या धीरामुळे या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला असून त्यांनी आज नीलमताईच्या हस्ते जलप्राशन करून आपले उपोषण सोडले. या सर्व घटनेत पाठपुरावा करीत असलेले अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles