Thursday, May 9, 2024

वीज तांत्रिक कर्मचार्यांचा निवडणुकीनंतर डीजे लावून जल्लोष…. गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)-वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या अहमदनगर यांची व्यवस्थापक समिती पंचवार्षिक 19 मार्च रोजी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमून डिजे साऊंड सिस्टिम लावून अधीक्षक अभियंता महावितरण सरकर कार्यालय च्या आवारात कर्मचारी विजयी उमेदवारांनी उल्लंघन केलेले असून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिव राष्ट्र सेनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवडून आलेले कर्मचारी सचिन चोरगे, कैलास अभंग, अशोक पाथरकर, श्रीराम वाकचौरे, बाबासाहेब वाकडे, एकनाथ शिंदे, अर्जुन झनान, शंकर जारडकर, गजानन हुलगुंडे, सतीश चोळके, संजय घाडगे यांनी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या एकत्र जमून डीजे सिस्टीम लावून कार्यालयाच्या आवारातच मिरवणूक काढली असून. याबाबत अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय अहमदनगर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून कामगारांना पाठीशी घातलेले असून. त्यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles