Friday, May 17, 2024

घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू, नगर शहरातील घटना

घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू, नगर शहरातील घटना
नगर : सावेडी रोडवरील महावीर नगर येथे एका घरामध्ये अचानक आग लागल्यामुळे घरामधील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमाराला घडली.

आगीमध्ये वैशाली विठ्ठल नन्नवरे (वय-४५) यांचा मृत्यू झाला. महावीर नगर या भागामध्ये महापालिकेचे मोकळे पटांगण आहे. महापालिकेने येथील काही जागा खासगी तत्त्वावर एका संस्थेला दिलेली आहे. या संस्थेच्या शेजारी असलेल्या एका घरातून सोमवारी सकाळी अकराच्या सुमाराला धूर येऊ लागला. नेमका धूर कशाचा आहे, याची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटात आग आटोयात आणली. घरामध्ये प्रवेश केला असता त्यावेळी घरामध्ये संबंधित महिला एका सोफ्यावर बसलेली दिसली. आगीत ती पूर्णपणे जळालेली होती.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून नेमकी आग कशामुळे लागली, किंवा हा अन्य काही प्रकार आहे का? याचा सुद्धा आता पोलीस शोध घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles