Tuesday, May 21, 2024

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेही ईडीच्या जाळ्यात…’ही’ मालमत्ता झाली जप्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने जाळं टाकले आहे. ( त्यांच्या 90 एकर जमिनीवर ईडीने टाच आणली आहे.

नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. तक्षशिला सिक्युरिटीजच्या नावावर ही जमीन होती. याचबरोबर तनपुरे यांच्या मालकीच्या 4.6 एकरच्या दोन बिगरशेती जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीच्या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर ईडीने तनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles