Friday, May 17, 2024

डाटा सेंटरच्या विषयाला स्थगिती देण्यासाठी विरोधी संचालकांची निदर्शने

डाटा सेंटरच्या विषयाला स्थगिती देण्यासाठी
माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालकांची निदर्शने
जिल्हा उपनिबंधकांकडून पहिल्यांदा ऑनलाईन प्रणाली कामाची चौकशी होऊ द्या
नगर – अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत सन 2015 मध्ये दिलेले ऑनलाईन प्रणालीचे काम अद्यापही मोठ्या प्रमाणात अपुर्ण आहे. रविवारी (दि.27 फेब्रुवारी) सोसायटीच्या बैठकित विषय क्रमांक 9 नुसार डाटा सेंटरचा विषय घेण्यात आला होता. ही बैठक सुरु होण्यापुर्वी सदर विषय स्थगित करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी विरोध दर्शवून निदर्शने केली. तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जो पर्यंत ऑनलाईन प्रणालीच्या कामाबाबत चौकशी होत नाही, तो पर्यंत डाटा सेंटरचा विषय स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात विरोधी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद आत्माराम दहिफळे, सुनील दानवे, दिलीप बोठे, अक्षय जावळे, एस.एफ. भळकट, पी.आर. बारगजे, पी.पी. साठे, द. खाडे, रमाकांत दरेकर, एस.जी. आराख आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारच्या बैठकित सत्ताधारी संचालक मंडळाने संस्थेचे डाटा सेंटर भाडेतत्वावर देण्याबाबत विषय घेतला होता. हा विषय गंभीर व आर्थिक खर्चिक स्वरूपाचा असल्यामुळे तसेच संस्थेच्या सर्व कामकाजाबाबत गोपनीय बाबी त्रयस्थ यंत्रणेकडे जाऊ नये, यासाठी विरोधी संचालकांनी या विषयाला विरोध दर्शविला आहे. हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवून सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेने 10 जून 2015 रोजी फक्त एक वर्षाच्या कराराने संस्थेचे ऑनलाइन प्रणालीचे काम या संस्थेत मानधन तत्वावर काम करत असलेल्या एका कर्मचार्‍यास 18 लाख रुपयात पूर्ण करून देण्यासाठी दिले होते. या ऑनलाईन प्रणालीसाठी तब्बल सुमारे 55 ते 60 लाख रुपये खर्च करुन देखील ते अद्यापि अपुर्ण असल्याने विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. तर सत्ताधारी संचालक मंडळाने बहुमताने दोन महिन्यापूर्वी पारनेर शाखेत डाटा सेंटरच्या नावाखाली ऑनलाइनचे काम नवीन व्यक्तीला दिलेले आहे. पूर्वी दिलेल्या ऑनलाइन प्रणालीचे काम अपूर्णच असल्याचे हा स्पष्टपणे पुरावा असल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles