Saturday, May 18, 2024

नगर तालुक्यातील’या’ गावावर आ.निलेश लंकेचे विशेष लक्ष

नगर तालुक्यातील’या’ गावावर आ.निलेश लंकेचे विशेष लक्ष
आमदार निलेश लंके यांचे निंबळकवर विशेष लक्ष
भरीव निधी ; गाव विकासाचा तयार होणारा आराखडा
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावावर आमदार निलेश लंके यांचे विशेष लक्ष असुन त्यांच्याकडुन गाव विकासासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी दिली.
आमदार निलेश लंके यांच्या निधीतून निंबळक मध्ये भव्य खेळाचे मैदान उभारण्यात येणार आहे. सुमारे दहा ते बारा एकर क्षेत्रावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल व इतर खेळांसाठी भव्य असे मैदान उभारण्यासाठी लंके यांच्याकडून ३ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सदर मैदानाची मोजणी, डिझाईन बनवली असुन मंत्रालयात पाठपुरावा सुरु आहे. तसेच दत्त मंदिर चौक काँक्रीटीकरण व सुशोभीकरणासाठी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निंबळक गावातील मुख्य रस्ता जय भवानी चौक ते खंडोबा मंदिर परिसरात स्ट्रीट लाईट बसविण्या साठी आमदार लंके यांनी निधी दिलेला आहे. आमदार निलेश लंके यांनी निंबळक गावच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याने ग्रामस्थांमधून लंके यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
निंबळक गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत शिंदे, बाळासाहेब पगारे, किरण गायकवाड, घनश्याम म्हस्के, भाऊसाहेब शिंदे, गंगेश रोकडे, सोमनाथ खांदवे यांच्याशी सविस्तर चर्चा करून गाव विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील. तसेच गरजेचे, प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामांची यादी करून ती कामे तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उर्वरित विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न राहील. गावातील सर्व प्रभागांमधील समस्या जाणून घेऊन त्यानंतर आराखडा तयार करण्यात येईल. त्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची मते जाणून घेण्यात येतील.
गावाला सद्यस्थितीत पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न भेडसावत असून त्याचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे. पाण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. निंबळक गावच्या विकासासाठी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली.

ग्रामपंचायत ने निंबळक गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन गाव विकासाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. निंबळक गावच्या विकासासाठी सर्वांनी गट तट, राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन गावविकासासाठी हातभार लावावा व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
…..सौ. प्रियंका लामखडे (सरपंच, निंबळक)

आमदार निलेश लंके यांचे निंबळक गावावर विशेष प्रेम दिसून येत आहे. आमदार लंके यांनी निंबळक गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. लंके यांनी दिलेल्या विशेष निधी बद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार.
….. अजय विलास लामखडे ( युवा उद्योजक)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles