Saturday, May 18, 2024

भिडे गुरुजींचे वादग्रस्त वक्तव्य….म्हणाले, डॉक्टर लुटारू आहेत… मारायच्या लायकीचे

अमरावती: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याआधी न्यायाधीशांवर वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात १०५ टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles