Friday, May 17, 2024

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा… शिक्षक नेत्यावर गुन्हा दाखल

तवणूक करून दोन वर्षांत दामदुप्पट व महिन्याला एका लाखास दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके याच्यासह पाच जणांविरोधात रविवारी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या टोळीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसह अनेकांना सुमारे १ कोटी ७९ लाखाला गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील ही रक्कम ५०० कोटींच्या आसपास असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बाबतचा पहिला गुन्हा नेवासे तालुक्यात दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. सन २०१८ ते सन २०२२ या कार्यकाळात अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँकेच्या माध्यमातून व रोख पैशांच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समजते. मोतीलाल ओसवाल ट्रेड कंपनीमध्ये आम्ही मोठी शेअर गुंतवणूक केली आहे. त्यात आम्हाला एक लाखामागे २० हजार मिळतात. त्यातील १० हजार रुपये आम्हाला व १० हजार तुम्हाला तसेच तुम्हाला तुमचे मुद्दल जेंव्हा हवी असेल तेंव्हा मिळेल, अशी बतावणी करून पहिले वर्षभर पैसे देण्यात आले. मात्र गेल्या अठरा महिन्यांपासून लाभार्थींना पैसे परत दिले नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी आपली एक कोटी ७९ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार नेवासा पोलीस स्टेशनला दिली असून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये प्राथमिक शिक्षक अधिक आहेत. शिक्षक बँकेतून रोख काढून त्यातून या घोटाळ्यात पैसे भरल्याची माहिती पुढे येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles