Sunday, May 19, 2024

राज्यमंत्री तनपुरे अचानक पोहोचले बाजार समितीत, प्रशासकांशी केली चर्चा

राज्यमंत्री तनपुरे अचानक पोहोचले बाजार समितीत, प्रशासकांशी केली चर्चा
अहमदनगर – राज्याचे उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि.२६) दुपारी अचानक नगर तालुका बाजार समितीच्या कार्यालयात जावून सरप्राईज व्हिजीट दिली. यामुळे बाजार समिती प्रशासनाची चंगलीच धांदल उडाली. राज्यमंत्री तनपुरे यांच्या भेटीच्या निमित्ताने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे कट्टर विरोधकही बऱ्याच कालावधी नंतर बाजार समिती कार्यालयात गेल्याचे पहावयास मिळाले.
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (दि.२६) नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात राज्यमंत्री तनपुरे सहभागी झाले होते. आंदोलनानंतर त्यांनी अचानक नगर तालुका बाजार समितीला भेट देण्याचा विचार केला.त्यानुसार त्यांचा ताफा बाजार समिती कार्यालयात गेला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी जिल्हापरिषद सदस्य रघुनाथ झिने, माजी तालुकाध्यक्ष केशव बेरड, अमोल जाधव, बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे अचानक बाजार समिती कार्यालयात आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. बाजार समितीचे प्रशासक तथा तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे व सचिव अभय भिसे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासक के.आर. रत्नाळे यांच्याशी सुमारे १० मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर तालुका बाजार समितीच्या कार्यालयाच्या सरप्राईज व्हिजीटची चर्चा काही वेळातच संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles