Saturday, May 18, 2024

खतरनाक गुन्हेगार जेरबंद, ४२ तोळे सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

खतरनाक गुन्हेगार जेरबंद, ४२ तोळे सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
नगर: श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व राहुरी परिसरात १७ ठिकाणी बंद घरात प्रवेश करून जबरी चोरी व घरफोडी करणारे चार आरोपी गजाआड करण्यात आले आहेत.

राम बाजीराव चव्हाण (वय २०, रा. आष्टी, जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनोद हबाजी भोसले (तिघेही रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. 24 फेब्रुवारी रोजी नगर तालुक्यातील चास येथे घरफोडी करून दोन लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यात घडलेल्या असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगर तालुक्यातील चास येथील घरफोडी आरोपी राम चव्हाण यानी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. तसेच आरोपी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून नगरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नगर-जामखेड रोडवरील आठवड घाट येथे सापळा लावून चार जणांना पकडण्यात आले. आरोपींचे दोन साथीदार दुचाकी तिथेच सोडून पळून गेले.

आरोपींकडून ४२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच तीन दुचाक्या असा २३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जिल्ह्यात घरफोड्या आणि जबरी चोऱ्या करत होते. आरोपींकडून नगर जिल्ह्यातील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील आरोपी प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई नगर तालुका पोलिस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles