Saturday, May 18, 2024

हाच तो दिवस…. सुप्रिया सुळे यांचे शरद पवारांबाबत खास ट्विट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी २२ फेब्रुवारी हा दिवस शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आदरणीय शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस. बरोबर ५५ वर्षांपूर्वी ते विधानसभेत निवडून गेले होते. संसदीय कामकाजात सक्रियतेची या ५५ वर्षात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भुषविली.”

यासह लोककल्याणकारी निर्णय घेऊन ते आग्रहाने राबविले देखील. त्यांनी या कार्यकाळात संसदीय प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावल्या. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या मार्गावर ते आजही अविरतपणे चालत आहेत. त्यांची ही वाटचाल आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. आदरणीय शरद पवार यांना संसदीय कारकीर्दीची ५५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles