Wednesday, April 17, 2024

नगर शहरात ‘या’ रस्त्यांवर वाहन लावल्यास द्यावे लागणार पार्किंग शुल्क

महापालिका प्रशासनाने शहरातील ३६ रस्ते व जागांवर ’पे अँड पार्क’ मंजूर करत त्यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. मागील वर्षी महासभेत या पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निविदा काढून खासगी संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर व निश्चित केलेल्या खुल्या जागांवर पार्किंगसाठी शुल्क द्यावे लागणार आहे.

महापालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पार्किंग झोन, नो हॉकर्स झोन, सम विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत ’पे अँड पार्क’ आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. अहवालाला महासभेत मंजुरी देण्यात आल्याबर निविदा प्रक्रिया होऊन खासगी संस्थेला पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला असून, यातून महापालिकेला पाच वर्षात २१.७५ लाख रुपये रॉयल्टी मिळणार आहे. लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय, बेलदार गल्ली, चाँद सुलताना विद्यालय समोरील रस्ता, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, मंगल गेट मटन मार्केट समोरील जागा, नेहरू मार्केट मोकळी जागा, वस्तू संग्राहलय, नोबल हॉस्पिटल लगतचा रस्ता, जुने सिव्हील हॉस्पिटल, लालटाकी रस्ता अप्पू हत्ती चौक ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते झेडपी कार्टरलगत, पोलीस लाईनलगत, बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौक ते नायरा पेट्रोल पंप, सातभाई मळा, सावेडी जॉगिंग ट्रॅक १, सावेडी जॉगिंग ट्रॅक २, मिसगर विद्यालयामागे, बाडिया पार्कमधील दक्षिणेकडील गेट जवळील जागा, एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता, इमारत कंपनी, अमरधाम पश्चिमेकडील कंपाउंड जवळील जागा, मानकर गल्ली, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा रस्ता, पांजरपोळ मोकळी जागा (मार्केटयार्ड चौक), पाईपलाईन रस्ता, पुणे बस स्थानकाजवळ, नेताजी सुभाषचंद्र चौक ते नवी पेठ शहर सहकारी बँकपर्यंत, कोठी रस्ता ते यश पलेस होटल, भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, प्रोफेसर चौक ते प्रेमदान हॉटेल चौक, नवीन कलेक्टर ऑफिस रस्ता, सेंट आण्णा चर्च रस्ता, बंगाल चौकी, चायना मार्केट, सहकार सभागृह रस्ता, सावित्रीबाई फुले संकुल (आकाशवाणी केंद्राशेजारी) या ठिकाणी सशुल्क वा हनतळ मंजूर केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles