Monday, May 20, 2024

खा. विखे म्हणाले, मनपातील सर्वच नगरसेवक माझ्या संपर्कात…पक्ष व चिन्ह वेगळे असले तरी…

नगर महापालिकेच्या सावेडीतील सावित्रीबाई संकुलात मनपाच्या एमआयआय सेंटरचे उद्घाटन खा. डॉ. विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. माझ्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मनपाचे बहुतांश सर्व नगरसेवक आले. अर्थात प्रत्येकजण माझा मित्र आहे. फोनद्वारे वा मेसेजद्वारे माझ्या संपर्कातही सारे आहेत. पक्ष व चिन्ह वेगळे असले तरी नगर विकासासाठी आम्ही एक आहोत, असे त्यांनी दाखवून दिल्याने त्यांना धन्यवाद असे म्हणत खा. विखेंनी दोन्ही हात जोडल्याने तोही चर्चेचा विषय झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अ‍ॅडव्हान्स हेल्थकेअर मोहिमेंतर्गत सर्वांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगून खा. डॉ. विखे म्हणाले, सिव्हीलमध्ये 18 कोटींची कॅथलॅब येत्या वर्षभरात उभारून मोफत अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी सुविधा देणार आहे. मनपाद्वारे 500 रुपयात सीटी स्कॅन सुविधा दिली जाणार आहे. दीड हजार रुपयात एमआरआय सेवा सुरू केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles