Saturday, April 27, 2024

मुलांना ऐतिहासिक मोडी लिपीचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला गौरव

अ.नगर जिल्हा परिषदचे शिक्षक सचिन ठाणगे यांचा “मोडी लिपी ” चा आदर्श उपक्रम
नगर : ऐतिहासिक कागदपत्रे असो वा शिवकालीन पत्रे असो, मोडी लिपीतील मजकूर अत्यंत सराईतपणे वाचण्याचे कौशल्य आता शालेय विद्यार्थी आवडीने आत्मसात करू लागले आहेत.
पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशील शिक्षक सचिन ठाणगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दुसरीचे विद्यार्थी मोडी लिपी शिकून तिचे वाचन आणि लेखन करण्याची आवड जोपासत आहेत.
१९६० पूर्वी मोडी लिपी राज्यातील शालेय शिक्षणात शिकवली जात होती. परंतु कालांतराने मोडी लिपी शिकवणे बंद झाले . आता पुन्हा ऐतिहासिक दुर्मिळ दस्तऐवज , जुनी कागदपत्रे वाचण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मोडी लिपीचे महत्व वाढू लागले आहे.
मोडी लिपीच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत . त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना एक वेगळी वाट शोधता यावी , यासाठी ग्रामीण भागातील मुलांना मोडी लिपी शिकविण्याच्या प्रकल्पातून भविष्यवेधी व्यवसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे.
पहिल्या टप्प्यात मुळाक्षरांची ओळख व प्रत्येक दिवशी १० अक्षरे शिकवली त्यामुळे मुले छोटी वाक्ये लिहायला आणि वाचायला शिकले .मुले शालेय अभ्यासाबरोबरच मोडी लिपीचा अभ्यास आवडीने करत आहेत. पुढेही संस्कृत भाषा शिकवण्याचा माणस आहे,
राज्याबाहेरील काही विद्यार्थी मोडी लिपी शिकण्यास उत्सुक आहेत ,त्यांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल असे ठाणगे यांनी सांगितले .
जागतिक दर्जाची पुणे जिल्हयातील आदर्श शाळा वाबळेवाडी येथे मुलांना जापनीज भाषा शिकवली जाते . त्याच धरतीवर अतिशय ग्रामिण आणि दुर्गम भागातील मुलांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मोडी भाषेचे ज्ञान दिले . त्याबद्दल अ.नगर जिल्ह्याचे कलेक्टर सिद्धराम सालिमठ यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचा आपल्या दालनात गौरव केला . ” मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाषा शिकवल्या तर त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल ,” असे ते म्हणाले .
दुसरीच्या मुलांनी मोडी लिपी अवगत करणे ही खूप विशेष बाब आहे , असे मत अ.नगर जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त करत शिक्षकाचे कौतुक केले .
या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,गटशिक्षणाधिकारी सिमाताई राणे , विस्तार अधिकारी गेणूजी नरसाळे , केंद्रप्रमुख यादव येवले मुख्याध्यापक चारुशिला रायकर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles