अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची निलेश लंके यांनी दिली आहे.
निलेश लंके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला स्वत: राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे येऊ शकतात. कालचं माझं राहुल गांधीशी बोलणं झालं आहे. शक्यतो, मीच उमेदवारी अर्ज दाखल करायला येतो असं त्यांनी मला सांगितल्याचं लंके म्हणाले.लंकेंनी राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला येतील असं सांगितलं असलं तरी नगर व शिर्डी दोन्हीकडे काँग्रेसचे उमेदवार नाहीत.
राहुल गांधी खरोखर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.