नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या विजयासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क, महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून ते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेला साथ द्यावी असे आवाहन करीत आहेत. भेटीगाठी सत्रा अंतर्गत खा. विखे पाटील यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच आशीर्वाद घेतले. विखे यांनी माजी आमदार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात विशेष लक्ष घालून लंकेंना पारनेरमध्येच रोखण्यासाठी रणनीती आखली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गावही पारनेर मतदारसंघात येते. या पार्श्वभूमीवर खा विखे पाटील यांनी आवर्जून अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद…
- Advertisement -