Tuesday, May 7, 2024

नगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप

नगर :विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, आपचे संघटक सुभाष केकाण हे उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या वतीने बोलताना राजेंंद्र फाळके यांनी सांगितले की, विखे हे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबात त्यांच्या सख्ख्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. रक्ताच्या नात्यातील असल्याचे भासविण्यासाठी दुसरी व्यक्ती उभी करून संपत्तीची विल्हेवाट लावल्याचा आरोपही अशोक विखे यांनी केला असल्याचे फाळके यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या तलाठी भरतीमध्येही अनेक डमी उमेदवार पास झाले. अशाच प्रकारे डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटूंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे नावातील साधर्म्य पाहून दिशाभुल करण्यासाठी डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप फाळके यांनी केला.

फाळके म्हणाले, निघोजच्या जानेवारी महिन्यात प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव आहे. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या सुधारीत मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर नीलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. नीलेश साहेबराव लंके यांचे नाव निघोजच्या मतदार यादीत टाकण्यासाठी अशी कोणतील शासकीय यंत्रणा पळाली असा सवाल फाळके यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles