पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारणी जाहीर
भाजप पदाधिकाऱ्यांनी ५ वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत घेऊन जा – अक्षय कर्डिले
नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकास कामांच्या माध्यमातून देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे, लोकसभा निवडणूक सुरू झाली असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दक्ष राहून काम करावे, निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासने ही खरी नसतात आपण ५ वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे, निवडणुकीच्या काळामध्ये गोड बोलून मते मिळत नसतात, त्यासाठी नागरिकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे लागते,आम्ही जनतेसाठी जीवाचे रान करून काम करतो, कामाची आठवण नागरिकांना करून दिली पाहिजे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदार संघामध्ये केलेली विकास कामांची माहिती नागरिकांना द्यावी, आपल्य सर्वांना मिळून त्यांना खासदार बनवायचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी भाजप लोकसभा प्रमुख तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, हरिभाऊ कर्डिले, संतोष मस्के, सुधीर भास्कर, काशिनाथ लवांडे, तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, मिर्झा मणियार, शिवाजी पालवे, सुनील साखरे, नवनाथ आरोळे, पुरुषोत्तम आठरे, वैभव खलाटे, सुनील परदेशी, संतोष शिंदे, बंडू पाठक, जनार्दन गीते, श्रीकांत आटकर, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे म्हणाले की, संसदेमध्ये जनतेचे प्रश्न सोडविणारा खासदार आपल्याला पुन्हा एकदा पाठवायचा आहे खासदार डॉ,सुजय विखे पाटील यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जा, पक्षाने दिलेली जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी व आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे असे ते म्हणाले
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून विकासाची कामे उभी राहिली, मात्र आमच्या हलगर्जीपणा व दोन गटामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र आम्ही खचून न जाता आमदार नसतानाही जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्या आहेत, त्या योजनांची माहिती जनतेला करून देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे,अशी भावना भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली. पाथर्डी तालुका नूतन भाजप कार्यकारणीचा सत्कार
कायम निमंत्रित सदस्य काशिनाथ लवंडे, पुरुषोत्तम आठरे,सुनील परदेशी, मिर्झा मणियार, तालुका सरचिटणीस सुरेश चव्हाण दादासाहेब चोथे हनुमान घोरपडे मनोज ससाने, तालुका चिटणीस आबासाहेब अकोलकर गीताराम वाघ, रामेश्वर फसले, महेंद्र शिरसाठ, मार्मिक कराळे, शिवाजी कारखेले, सतीश पालवे, परमेश्वर गीते, बाबाजी पालवे, प्रमोद गाडेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आटकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राहुल अकोलकर, भाजपा वकील आघाडी सरचिटणीस पोपट पालवे व प्रवीण पालवे आदींचा यात समावेश आहे