Tuesday, May 28, 2024

स्वयंचलित देशी माठ… थंडगार पाण्यासाठी भन्नाट जुगाड… व्हिडिओ

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वयंचलित मटका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. उन्हाळ्यात अनेकजण माठातून पाणी पिणे पसंत करतात. माठातले थंडगार पाणी पिऊन तुमची तहान भागते. शिवाय निरोगी राहण्यासाठीही मदत मिळते. अलिकडे बाजारामध्ये नळ बसवलेले अनेक माठ येतात. पण नळ खराब होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे एका व्यक्तीने भन्नाटच जुगाड लावला आहे. माठातून हाताने किंवा नळाच्या साहाय्याने पाणी काढण्याची झंझंटच दूर केली आहे. माठाला स्वयंचलित माठ बनवले आहे.माठाला काही वायर जोडलेले दिसत आहेत आणि एक मोटर बसविलेली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही काचेच्या पाईपजवळ तुमचा ग्लास नेले तर माठातून पाणी आपोआप तुमच्या ग्लासात येईल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles